केळूस

ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग

कामाची वेळ : सोमवार ते शुक्रवार

सकाळी ०९.४५ ते संध्याकाळी ०६.१५

संपर्क / WhatsApp

+91 8010057725

गावा बद्दल

वेंगुर्ले तालुक्यातील किनारपट्टी वरील फळयेफोंडा व खुडास या दोन डोंगरादरम्यान हरित वनराईने व सुंदर समुद्र किनारपट्टी लाभलेला, रांजणवाडी, बापडतेवाडी, देऊळवाडी, मधलीवाडी, डिमवाडी, मोबारवाडी, खुडासवाडी, काळवीवाडी, बोवलेवाडी, तळीवाडी, फळयेफोंडवाडी अशा गावाच्या ११ वाड्यांवर ग्रामदेवता श्री. तारादेवीचा कृपाआशीर्वाद लाभलेला केळूस गाव.

केळूस गावची लोकसंख्या १५२९ एवढी आहे. पूर्वेकडे आंदुर्ले (ता. कुडाळ), पश्चिमेकडे अरबी समुद्र, उत्तरेकडे म्हापण (ता. वेंगुर्ला), दक्षिणेकडे वायंगणी (ता. वेंगुर्ला).

गावामध्ये प्रमुख व्यवसाय शेती, मासेमारीसह नारळ, सुपारी, आंबा, काजू, कोकम या माध्यमातून उदरनिर्वाह केला जातो.

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरुवर्य तथा आद्यशिवचरित्रकार कै. कृष्णाजी अर्जुनराव केळुसकर यांचे हे गाव.

गावाचे क्षेत्र

भौगोलिक क्षेत्र७८२.५९.५२
लागवडीलायक क्षेत्र४४५.७२.८४
भातपिकाखालील क्षेत्र४४५.७२.८४
पडीक क्षेत्र३२७. ७८.०८
बागायती क्षेत्र४१.११.०

गावाची लोकसंख्या

महसुली गावपुरुषस्त्रीएकूण
केळूस४३६४५२८८८
कालवी३०२३३९६४१
एकूण७३८७९११५२९

गावातील एकूण कुटुंबे

एकूण घरेएकूण कुटुंबेदारिद्ररेषेखालील कुटुंबेदारिद्ररेषेवरील कुटुंबे
६४६४१४२२८१८६

कार्यालये

ग्रामपंचायत कार्यालयसोसायटी
तलाठी कार्यालयबँक
आरोग्य उपकेंद्रमंडळे
ग्रंथालयमाध्यमिक शाळा
प्राथमिक शाळाअंगणवाडी
मिनी अंगणवाडीपोस्ट ऑफिस

गावातील पर्यटन / प्रमुख स्थळे

  1. केळूस मोबर किनारपट्टी
  2. कालवी किनारपट्टी
  3. खुडास किनारपट्टी
  4. फळयेफोंडा किनारपट्टी
  5. श्री. तारादेवी मंदिर
  6. प. पु. नामदेव गोसावी महाराज समाधी स्थळ

गावातील धार्मिक स्थळे

बापडतेवाडी

  1. प. पु. नामदेव गोसावी महाराज समाधी स्थळ
  2. श्री. देव विठ्ठल मंदिर
  3. श्री. देवी भगवती मंदिर
  4. श्री. देव कुलदेव मंदिर
  5. श्री. देव सिद्ध महापुरुष

देऊळवाडी

  1. श्री. देवी तारादेवी मंदिर

मधलीवाडी

  1. श्री. देव बांदेश्वर मंदिर
  2. श्री. देव महादेव मंदिर
  3. श्री. देव घाडवस मंदिर
  4. श्री. देव ब्राम्हण मंदिर
  5. श्री. देवी भागवती मंदिर

डिमवाडी

  1. श्री. देव सिद्ध महापुरुष
  2. श्री. देव मारुती मंदिर

मोबारवाडी

  1. श्री. देवी जलमाई मंदिर
  2. श्री. देव म्हातारबाबा
  3. श्री. देव ब्राम्हण मंदिर

खुडासवाडी

  1. श्री. देवी जैनब्राम्हण आंबाजोगाई देवालय

काळवीवाडी

  1. विठ्ठल मंदिर
  2. मुरलीधर मंदिर
  3. गावडेवस ब्राम्हण मंदिर

फळयेफोंडावाडी

  1. नागेंद्रगिरी मठ
  2. देव ब्राम्हण
  3. कसालकर घरदेवता
  4. वेळकर महापुरुष

केळूस गावातील न्याहारी निवास व्यवस्था

निवास व्यवस्था नावमालकाचे नाववाडीचे नाव
सिताबीचश्री. गोविंद रामचंद्र केळुसकरकालवीवाडी
सगुणताराश्री. रमेश सगुण वेंगुर्लेकरकालवीवाडी
लक्ष्मीश्री. गुणवंत वसंत गोकरणकरकालवीवाडी

गावाला मिळालेले पुरस्कार

  1. निर्मल ग्राम पुरस्कार
  2. पर्यावरण विकासरत्न
  3. महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार
  4. संत गाडगेबाबा पुरस्कार